हिरवा देव बोले आदिवासी पोरा
जंगल वाढव हिच माझी सेवा
तांबडा देव बोले आदिवासी पोरा
पाणी तु वाचव हिच माझी सेवा
वाघदेव बोले आदिवासी पोरा
गूरढोरा सांभाळ हिच माझी सेवा
पांडी आई बोले आदिवासी पोरा
बीया तू राख हिच माझी सेवा
महादेव बोले आदिवासी पोरा
जमीन सांभाळ हिच माझी सेवा
हनुमान बोले आदिवासी पोरा
गाव नको सोडू तू हिच माझी सेवा
महालक्ष्मी बोले आदिवासी पोरा
गाव तुझी संपत्ती ह्योच खरा मेवा
आदिवासी पोरा शाना तू खरा
नको मारू शासन दरबारी फेरया
आदिवासी पोरा शप्पथ घे तू
गावात राहून सक्षम हो तू